“हा” तर ट्रेलर आहे म्हणत भाजपा खासदार रंजिता कोळी यांच्या घरावर हल्ला

0 680

भरतपूर –   भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राजस्थान (Rajasthan) मधील  बयाना  येथील खासदार असणाऱ्या रंजिता कोळी (Ranjita Koli) यांच्या घरावर पुन्हा एकदा हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजवरून (CCTV camera footage) पोलीस शोध घेत आहे.  हल्लेखोरांनी खासदार रंजिता कोळी यांच्या घराबाहेर तीन राऊंड गोळीबार केला आहे. (BJP MP Ranjita Koli’s house attacked saying “this” is a trailer)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  रंजिता कोळी यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११.४५ वाजता घडली. येथे हल्लेखोरांनी त्याच्या घरावर तीन राऊंड गोळीबार केला. त्यानंतर त्यांचा फोटो गेटबाहेर लावून त्यावर क्रॉस चिन्ह काढले. या फोटोसोबत हल्लेखोरांनी खासदार रंजिता कोळी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्रही चिकटवले आहे. या हल्ल्याच्या घटनेमुळे रंजिता कोळी यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

पत्रात अपशब्द वापरत धमकी
खासदार रंजिता कोळी यांच्या घरावर चिकटवलेल्या धमकीच्या पत्रात हल्लेखोरांनी हा केवळ ट्रेलर असल्याचे म्हणत अपशब्द वापरले आहेत. तसेच, पुढच्या वेळी बुलेट आत असेल, असे म्हटले आहे. हल्लेखोरांनी रंजिता कोळी यांना पळून जाण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचा स्पष्ट इशारा देत तुला वाचवायला कोणी येणार नाही, असेही म्हटले आहे. दरम्यान, हल्ल्याच्या या घटनेनंतर बयाना शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तेथून रिकामी काडतुसे जप्त केली. तसेच, याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलीस पाहत आहे. अद्यापपर्यंत आरोपींचा शोध लागलेला नाही. लवकरच आरोपींचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.पाच महिन्यांपूर्वीही रंजिता कोळी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी रंजिता कोळी रुग्णालयाची पाहणी करून परतत होत्या. त्यादरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.  (BJP MP Ranjita Koli’s house attacked saying “this” is a trailer)

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी.., चार आरोपींना अटक

Related Posts
1 of 1,487
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: