
कोण आहे जयकुमार गोरे
माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे भाजप आमदार आहेत. 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही ते निवडून आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांचे सख्खे भाऊ शेखर गोरे हे त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. भाजपने त्यावेळी हा मतदारसंघ जयकुमार गोरे यांच्यासाठी मागितला होता. तर शेखर गोरे यांना शिवसेना तिकीट देण्यास तयार होती. शेखर यांना शिवसेनाचा पाठिंबा होता. त्यामुळे दोन भावांमधील निवडणुकीची लढत चांगलीच रंगतदार बघायला मिळाली होती. या रंगतमुळे राज्यभरात गोरे बंधुंची चर्चा झाली होती. जयकुमार गोरे हे 2009 साली अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर 2014 साली ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.