भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत, दंगा करत आहेत – जयंत पाटील

0 138
 नवी मुंबई –  राज्यत सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांच्या (ST employee) आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil)  यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करत महाविकास आघाडी सरकार एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे अशी भूमिका माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली आहे.(BJP leaders are going ahead in the agitation, are rioting – Jayant Patil)
माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले आजपर्यंत सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने ही त्यांच्या संघटनांकडून व्हायची. कोणताही राजकीय पक्ष अशा संघटनांमध्ये पुढे जाऊन आंदोलन करत नाही. सर्व राजकीय पक्षांनी या मर्यादा पाळल्या होत्या. पण भारतीय जनता पक्ष एनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संघटना उत्सुक नाही दिसल्यावर स्वतःच पुढे येऊन आंदोलन करायला लागले आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
Related Posts
1 of 1,518
 पुढे जयंत पाटील म्हणाले एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत, दंगा करत आहेत, अर्वाच्च बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात असल्याचे ते म्हणाले. तसेच परिवहन मंत्री अनिल परब कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करत असून हे प्रश्न लवकर सुटावेत, हीच राज्य सरकारची भूमिका असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.(BJP leaders are going ahead in the agitation, are rioting – Jayant Patil)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: