DNA मराठी

Ram Shinde :- भाजपने राम शिंदेवर सोपवली मोठी जबाबदारी…

पक्षाने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे हे आज कर्नाटक दौऱ्यावर रवाना

0 13

अहमदनगर  : भारतीय जनता पार्टाने कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी देशातील 54 नेत्यांची टीम तयार केली आहे. यामध्ये स्टार प्रचारक माजी मंत्री आमदार प्रा राम शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.
पक्षाने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे हे आज कर्नाटक दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्या खांद्यावर पक्षाने महत्वाच्या मतदारसंघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकायचीच या इराद्याने भाजपने जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. कर्नाटकमधील 54 कठिण मतदारसंघावर भाजपने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघावर लक्ष ठेवण्यासाठी देशातील 54 निवडक नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या 54 जणांच्या केंद्रीय टीममध्ये कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आमदार शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्रात आणखीन पाच नेत्यांचा या टीममध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

जिल्ह्यातील पर्यटन विकासास चार कोटीचा निधी… खासदार डॉ. सुजय विखे पाटील

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बंगलोर जिल्ह्यातील 177 अनेकल विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी आमदार प्रा राम शिंदे यांच्यावर सोपवली आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड, या महाराष्ट्रातील नेत्यांचा 54 जणांच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Related Posts
1 of 2,528

भारतीय जनता पार्टीने देशातील निवडक 54 नेत्यांची टीम कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार केली आहे. कर्नाटकमधील 54 कठिण मतदारसंघावर ही टीम लक्ष ठेवून असणार आहे. 8 व 9 एप्रिल रोजी आयोध्या दौऱ्यात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर आमदार प्रा.राम शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह आज कर्नाटक दौऱ्यावर रवाना झाले आहेत.कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी 13 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. तर 20 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 24 एप्रिल अर्ज माघार घेण्याचा दिवस आहे.10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी निकाल आहे.
कर्नाटकमधील बंगलोर जिल्ह्यातील 177 अनेकल विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात मुसंडी मारण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपने आमदार प्रा राम शिंदे यांच्या खांद्यावर प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. हा मतदारसंघ सर करण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे हे पुढील काही दिवस या मतदारसंघात तळ ठोकून असणार आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: