बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन

0 322

नवी मुंबई –  बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झालं आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या आधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे. सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत असून, त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांचे स्टेटमेंट घेण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सध्या मुंबई पोलिसांची टीम कपूर हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. दिवंगत सिद्धार्थची बहीण आणि मेहुणाही रुग्णालयात पोहोचले आहेत.

हे पण पहा –  आमदार निलेश लंके यांच्या कामाचं राज्यमंत्री आदिती तटकरेंकडून कौतुक

Related Posts
1 of 1,603

सिद्धार्थची कारकीर्द

अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: