जामखेडमधील ‘त्या’ हत्याकांडात मोठा खुलासा; पत्नीसह तीन आरोपींना अटक

0 298
Big revelation in 'that' massacre in Jamkhed; Three accused including wife arrested

 

अहमदनगर – अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील जामखेड (Jamkhed) तालुक्यामधील खर्डा परिसरात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री विशाल ईश्वर सुर्वे या युवकाची निघृण हत्या करण्यात आली होती. या हत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

 

या धक्कादायक घटनेनंतर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी यानंतर तपासाची चक्रे  फिरवत या प्रकरणात तीन आरोपींना अटक करत मोठा खुलासा केला आहे.  ही हत्या अनैतिक संबंधातून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मयत विशाल सुर्वे याची पत्नी पुजा आणि कृष्णा यांचे अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधातून पुजाने मयत पती यांचे लोकेशन कृष्णाला दिले त्याने त्याचा मित्र कन्हेरकर यास घेऊन रस्त्यावर मोटारकार आडवी लावली आणि गाडी बंद पडल्याचे नाटक केले ज्यावेळेस मयत विशाल गाडी घेऊन आला त्यावेळी रस्त्यावर गाडी अडवी दिसल्याने गाडी थांबवली व कारण विचारले तेव्हा गाडी बंद पडली आहे क्रू ड्रायव्हर हवा आहे.

 

Related Posts
1 of 2,107

तसेच परत पान्हा हवा आहे तो पान्हा काढत असताना मंदिराच्या पाठीमागे लपलेल्यांने आंधारात येऊन मयत विशालच्या डोक्यात लोखंडी राॅड घातला तो खाली पडल्यावर परत राॅडने वार केले. यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता यातच तो मयत झाला.  या प्रकरणी मुख्य आरोपी कृष्णा संजय सुर्वे, मयताची पत्नी, आणि श्रीधर राम कन्हेरकर  या तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: