
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतः मान्य केले की केंद्र व राज्य सरकारच्या वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील कोळसा पुरवणारी साखळी खंडीत झाली. त्यामुळे राज्यावर विजेचे संकट आले आहे. मात्र याला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी माझी त्यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. एक पाऊल त्यांनी मागे जावे एक पाऊल मी पुढे येतो’ अशी देखील विनंती नितीन राऊत यांनी केली.
आज राज्य वीज कर्मचाऱ्यांचा संप सुटला तरी लोडशेडिंगचे संकट मिटणार नाही. कारण कोल इंडियाच्या युनियन देखील संपावर गेले आहे. त्यामुळे पुढची दोन दिवस राज्याला कोणताही कोळशाचा पुरवठा होणार नाही. त्यामुळे महानिर्मिती व एनटीपीसी दोघांचेही औष्णिक विद्युत केंद्र कोळसा अभावी प्रभावित होणार आहे. महानिर्मिती रोज कोल इंडिया कडून 1 लाख 30 हजार मॅट्रिक टन कोळसा विकत घेते. दोन दिवस यातला एक टन कोळसा महानिर्मितीला मिळणार नाही. त्यामुळे राज्यातील पारस, नाशिक, परळी व भुसावळ या केंद्रावरील 1900 MV वीजनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती एनटीपीसीच्या केंद्राची आहे राज्य सरकारला रोज पाच हजार मेगावॅट वीज मिळते मात्र कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे त्यांची वीज निर्मिती देखील प्रभावित होईल.(Big power crisis in the state: Energy Minister Nitin Raut admits; Said coal ..)