मोठी बातमी..! KKच्या डोक्याला आणि चेहऱ्याला जखमा; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

0 195

 

 

मुंबई – प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ (KK) यांच्या निधनानंतर एक मोठा खुलासा झाला आहे. गायकाच्या अंगावर जखमा झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी ‘असामान्य मृत्यू’चा गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील शो संपल्यानंतर केके हॉटेलमध्ये कोसळला. त्याला खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

 

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता पोलिसांनी केकेच्या मृत्यूसंदर्भात ‘असामान्य मृत्यू‘चा गुन्हा दाखल केला आहे. अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की गायकाच्या गालावर आणि डोक्याला जखमा झाल्या आहेत. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात शवविच्छेदन केले जाईल. याशिवाय हॉटेल कर्मचारी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचीही पोलिस चौकशी करत आहेत.

कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बुधवारी त्याचे शवविच्छेदन केले जाईल, त्यानंतर मृत्यूचे कारण कळेल. एका महाविद्यालयाने मंगळवारी दक्षिण कोलकाता येथील ‘नझरूल मंच’ येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेथे सुमारे एक तास परफॉर्म केल्यानंतर केके आपल्या हॉटेलवर परतला तेव्हा त्याला अस्वस्थ वाटले आणि अचानक बेहोश झाला.

 

 

Related Posts
1 of 2,262

गायकाला दक्षिण कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे रात्री 10 वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

 

 

केके 53 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. केकेने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी दिली. केकेच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘यारों’, ‘तडप तडप के’, ‘बस एक पल’, ‘आँखों में तेरी’, ‘कोई काहे’, ‘इट्स द टाइम टू डिस्को’ इत्यादींचा समावेश आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: