मोठी बातमी! गाय तस्करांच्या बेकायदा बांधकामांवर आता ‘मामाचा बुलडोझर’

0 257

 

दिल्ली – मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) आता गो तस्कर प्रशासनाच्या निशाण्यावर आले आहेत. गो तस्करीच्या तीन आरोपींच्या घरावर कारवाई करत मंदसौर प्रशासनाने सोमवारी बुलडोझर (Bulldozer) फिरवला आहे. यामध्ये यापूर्वी उज्जैनमध्ये 13 गायी जाळल्याप्रकरणी आरोपी असलेल्या मुखतियारचे घरही फोडण्यात आले आहे. तर अन्य दोन तस्करांची अवैध बांधकामेही उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

 

मुख्तियार यांच्याशिवाय गोवंश तस्करीचे सराईत गुन्हेगार अकबर सोडा आणि साबीर गेडा यांचे सरकारी जमिनीवर बांधलेले बेकायदा घर प्रशासनाने पाडले आहे. या दोन्ही आरोपींवर गाय तस्करीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

यासोबतच प्रत्येकी 10,000 रुपयांचे बक्षीसही धार पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले आहे. अतिक्रमणावर बुलडोझरच्या संपूर्ण कारवाईदरम्यान, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुलतानपुरा गावात एसडीएम, तहसीलदारांसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

Related Posts
1 of 2,139

संवेदनशील गाव मुलतानपुरा हे गाय तस्करीचा बालेकिल्ला

मंदसौरपासून अवघ्या 5 किमी अंतरावर असलेले मुलतानपुरा हे गाव गाईच्या तस्करीचा बालेकिल्ला असल्याचे सांगितले जाते. येथून दररोज गायीची तस्करी होते. गावात राहणारे अनेक गुन्हेगारही तस्करीच्या गुन्ह्यात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात पकडले गेले आहेत. हा परिसर अतिसंवेदनशील असल्याने अवैध अतिक्रमणावर कारवाई करताना सुमारे 100 पोलिसांसह प्रशासनाचे 50 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: