उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज; थेट शरद पवारांकडे केली तक्रार?

0 353
Big news! Shiv Sena-NCP Chief Minister and Home Minister will be exchanged?

मुंबई – काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांनी एकत्र येऊन 2019 विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) राज्यात महाविकास आघाडी सरकार (MVA) स्थापन केला. मात्र मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांविरोधात वक्तव्यं करत आहे. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी जाहीर केली आहे.

भाजपाविरोधात (BJP) राष्ट्रवादी काँग्रेस मवाळ भूमिका घेत असल्याने उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपली ही नाराजी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे व्यक्त केली आहे. शिवसेना भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना राष्ट्रवादी मात्र मवाळ भूमिका घेत असल्याचं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगितलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील सदस्यांना टार्गेट करत असताना राष्ट्रवादी मवाळ भूमिका घेत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादी भाजपाला आव्हान देण्याची वेळ आली तेव्हा बॅकफूटवर गेल्याच्या काही घटनाही सांगितल्या आहेत.

शिवसेनेचा आक्षेप असणाऱ्या घटना
१३ मार्चला मुंबई पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसीमधील सायबर विंगच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय बदलण्यात आला आणि त्याजागी मलबार हिलमधील घऱी जबाब नोंदवण्यात आला. यामुळे शिवसेना नाराज आहे. पोलिसांना सांभाळणारं गृहखातं सध्या राष्ट्रवादीकडे आहे.

नवाब मलिक यांना ईडीने अचक केल्यानंतर शिवेसना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलताना दोन्ह बाजूंनी संयम राखावा आणि गोष्टी हाताबाहेर जाण्यापासून रोखावं असं सांगितलं

Related Posts
1 of 2,357

गतवर्षी, जेव्हा सभापतींना शिवीगाळ केल्यामुळे भाजपाच्या 12 आमदारांना सभागृहातून एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं तेव्हादेखील अजित पवारांनी पुन्हा संयमाची भूमिका घेत आमदारांना काही तास किंवा एका दिवसासाठी शिक्षा होऊ शकते, पण १२ महिन्यांसाठी नाही असं म्हटलं होतं.

२८ मार्च रोजी राज्यसभा खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी ट्विट केलं होतं की, “जर नरेंद्र मोदी जनादेश जिंकले आहेत आणि त्यांना जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून दाखवले जात असेल तर त्यांच्यात काही गुण असावेत किंवा त्यांनी चांगलं काम केलं असावे, जे विरोधी नेते शोधण्यात अक्षम आहेत.”

शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपादेखील एकीकडे मुंबई महापालिका आणि राज्य सरकारशी संबंधित प्रकरणांवरुन शिवसेनेवर आक्रमकपणे हल्ला करत असताना राष्ट्रवादीविरोधात मात्र मवाळ भूमिका घेत आहे. २४ मार्चला फडणवीसांनी सभागृहात पोलिसांकडून खंडणीचं रॅकेट चालवलं जात असल्याचं आरोप करताना म्हटलं होतं की, “वरपर्यंत द्यावे लागतात…पण याचा अर्थ मंत्री नाहीत (गृहमंत्री दिलीप वळसे पाटील). मी त्यांना गेल्या २५ वर्षांपासून ओळखतो आणि खात्रीने सांगू शकतो.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: