
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
मुंबई – अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना गावदेवी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्या प्रकरणी अटक केली आहे. आज त्यांना किला कोर्टातमध्ये हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सदावर्ते यांच्याबाजूने अॅड. महेश वासवानी यांनी युक्तीवाद केला. 110 एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने अॅड. संदीप गायकवाड यांनी बाजू मांडली. तर सरकारच्यावतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. कोर्टाच्या या निर्णयानंतर सदावर्ते हे जामिनासाठी उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर 109 एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.