मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेस ने सहा वर्षासाठी निलंबित केले चौदा नगरसेवक

0 1,633

उस्मानाबाद – आपल्या पक्षाच्या विरोधात काम केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने आपल्या तब्बल १४  नगरसेवकांना पुढील सहा वर्षासाठी निलंबित केले आहे. या राष्ट्रवादीच्या या निर्णयाने उस्मानाबाद (Osmanabad) मध्ये एक मोठा भूकंप आला आहे. हा निर्णय उस्मानाबाद जिल्ह्यपातळीवर घेण्यात आला आहे. (Big news! The Nationalist Congress Party has suspended 14 councilors for six years)

जिल्हा निरीक्षक रमेश बारस्कर यांच्या बैठकीत माजी आमदार राहुल मोटे,ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.  हे चौदा नगरसेवक तुळजापूर विधानसभेचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हे नगरसेवक पाटील यांच्यासबोत काम करत होते. तसेच २०१९ पक्षाच्या कोणत्याही बैठकीस हजर न राहिले नसल्याकराणाने ही कारवाई करण्यात आली आल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री कतरिनाचा सलमान खानवर मोठा आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Related Posts
1 of 1,518

राष्ट्रवादीने निलंबित केलेल्यांमध्ये नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्यासह विनोद गंगणे, औदुंबर कदम,नगरसेविका अर्चना विनोद गंगणे, अश्विनी रोचकरी ,चंद्रकांत कणे, मंजुषा देशमाने, किशोर साठे,विजय कंदले,रेशमा गंगणे, वैशाली कदम,भारती गवळी, पंडित जगदाळे, आशाताई विनोद पलंगे यांची नावे आहेत. राष्ट्रवादीकडून एक परिपत्रक यासंदर्भात काढण्यात आले आहे. (Big news! The Nationalist Congress Party has suspended 14 councilors for six years)

हे पण पहा – नाशिकच्या ‘ या ‘ भागात बिबट्याचा मुक्त संचार ( पहा व्हिडीओ )

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: