Big news! The lights will be off all day tomorrow in this part of Ahmednagar cityBig news! The lights will be off all day tomorrow in this part of Ahmednagar city
प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

अहमदनगर –  राज्यासह अहमदनगर शहराचा (Ahmednagar city) देखील पारा मागच्या काही दिवसांपासून वाढत आहे. शहराचा तापमान सध्या  ४० अंशाच्या पुढे गेला आहे.  यातच मागच्या आठवड्यपासून अहमदनगर शहरातील अनेक भागात वीज चालू बंद होत असल्याने  नागरिकांचे हाल होत आहे.

तर आता अहमदनगर शहर तथा ग्रामीण विभागामध्ये दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी ९ एप्रिल शनिवार रोजी अहमदनगर शहर परिसरातील काही भागात दिवसभर वीज बंद राहणार आहे. शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांच्या अडीअडचणीमध्ये आणखी वाढ होणार आहे.  वीज बंदबाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर शहरातील  प्रोफेसर कॉलनी चौक, चितळे रोड, एमएसईबी कॉलनी, समता कॉलनी, साईनगर, फुलसुंदर मळा, चिपाडे मळा, भवानी नगर, माळीवाडा, हातमपुरा, जुना बाजार, जुने कलेक्टर ऑफिस, जी.पो.ओ ऑफिस,कुष्ठधाम रोड, गावडे मळा,  कापड बाजार, सर्जेपुरा, लक्ष्मी कारंजा, नवी पेठ, शहाजी रोड, सावेडी, गुलमोहर रोड, तारकपूर, भिस्तबाग, मार्केट यार्ड, सारसनगर, विनायकनगर, भोसले आखाडा, किग्ज गेट, पारशा खुंट, तपकीर गल्ली, अडते बाजार, भूषण नगर तसेच कोळगाव, वाळकी, जुने मुकुंदनगर,  दर्गा दायरा , सीआयव्ही सोसायटी, जेऊर, पांगरमल, उदरमल, धनगरवाडी, बहिरवाडी, इमामपूर, ससेवाडी, वाघवाडी, पांढरीपूल, खोसपुरी, पिंपळगाव, माळवी, मांजरसुंबे, डोंगरगण, अरणगाव, सोनेवाडी, नारायणडोह या  भागामध्ये  वीज बंद राहणार आहे.

तसेच ३३/११ के.व्ही नारायण डोह, भाळवणी, मिरी, गुंडेगाव उपकेंद्रातील सर्व वाहिन्या व त्यावरील परिसराची वीजही बंद राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *