
अहमदनगर – सोलापूर रोडवर( Solapur Road) भीषण अपघातात झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
सोलापूर महामार्गावर दोन मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा सकाळी 6 वाजता समोरासमोर भीषण अपघात झाली या अपघातात दोन्ही ट्रकचे वाहम चालक जखमी झाले असून जखमींना खाजगी रुग्णालत उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
RJ-27-GC-JT-5635 अहमदनगर कडून सोलापूर कडे जात असतांना समोरून सोलापूर कडून अहमदनगर कडे येणारी मालट्रक नंबर TN-34-AA-9940 यांची दहिगांव गावां जवळ समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.अपघातात दोन्ही वाहनांचे खालील चालक जखमी झाले आहेत.
भिमराज मिना सराडा जिल्हा उदयपूर राजस्थान तर दुसरा चालक शरदकुमार गंगा स्वामी पालक ओड जिल्हा धरमपुरी तामिळनाडू येथील आहेत.