मोठी बातमी ! शिवसेना-राष्ट्रवादीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाची होणार अदलाबदल ?

0 249
Big news! Shiv Sena-NCP Chief Minister and Home Minister will be exchanged?
मुंबई –  दोन दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची (NCP) तक्रार केल्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये (MVA) घडामोडींना वेग आले आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष भाजपाविरोधात मवाळ भूमिका घेत असल्याची नाराजी जाहीर केल्यानंतर नेत्यांमध्ये भेटीगाठी सुरु आहेत. शिवसेनेचा मूळ आक्षेप गृहखात्यावर असल्याचं बोललं जात होतं. त्यातच आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. दुसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील गृहखातं शिवसेनेला मिळाला तर आनंदच असल्याचं म्हटलं आहे.(Big news! Shiv Sena-NCP Chief Minister and Home Minister will be exchanged?)

राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक आहे. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या अदलाबदलीची शक्यता असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला आहे.

ते म्हणाले की, “शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडून गृहमंत्रीपद मागितलं जात आहे. हे ऐकूनच मला आश्चर्य वाटलं. मुख्यमंत्र्यांना सर्व मंत्र्यांचे अधिकार असतात. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असून त्यांना कोणतंही खातं ठेवण्याची गरज नाही. सर्व खाती त्यांच्या नियंत्रणात असतात. राष्ट्रवादीकडूनही कधीतरी खासगी आम्हाला मुख्यमंत्रीपद हवी असल्याची चर्चा सुरु असते. आता कदाचित त्यांच्यात अदलाबादल होणार असेल तर माहिती नाही”.

Related Posts
1 of 2,222

पुढे ते म्हणाले की, “गृहमंत्रीपद भाजपावर सूड उगवण्यासाठी हवं आहे, जनतेची सेवा करण्यासाठी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नको. याच सूड भावनेतून राज्याचा एक राजकीय पक्ष भाषा करत असेल तर आश्चर्य आहे”

तर दुसरीकडे गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे. “अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून, माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करीत आहेत,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. (Big news! Shiv Sena-NCP Chief Minister and Home Minister will be exchanged?)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: