
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
मुंबई – येणाऱ्या काही महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका (Municipal elections)पार पडणार आहे. मुंबई, पुणे आणि औरंगाबाद इत्यादी मोठ्या शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुका राज्यात पार पडणार आहे. यासाठी आता पासूनच प्रत्येक पक्षाने आप आपली तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने आगामी निवडणुकीत ते भाजपबरोबर (BJP) युती करण्याची शक्यता आहे . याचदरम्यान महाविकास आघाडीमधील (MVA)घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना (ShivSena)आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP)देखील युतीसाठी (Shiv Sena-NCP alliance) चर्चां सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.
Related Posts
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारविरोधात आक्रमक झालेल्या भाजपला रोखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा सुरू असून अद्याप याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
तर नाना पटोले (Nana Patole) यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यापासून पक्षाने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावरच लढू, असं नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी याआधी अनेकदा स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला वगळून युतीसाठी प्रयत्न सुरू केल्याचं समोर येत आहे.