मोठी बातमी ! राज ठाकरे यांची माघार ?; ‘तो’ निणर्य घेतला मागे

0 1,460
Big news! Raj Thackeray's Ayodhya tour to be canceled ?; Find out the exact reason

 

मुंबई –   मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेऊन पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांवरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात मनसे कार्यकर्त्यांकडून ३ मे रोजी महाआरतीचा आयोजन करण्यात आला होता. मात्र आत राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेत उद्या होणारी महाआरती रद्द केल्याची घोषणा केली आहे.

उद्या  संपूर्ण देशात  रमजान ईद असल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे कि उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन.

 

Related Posts
1 of 2,088

 दरम्यान, मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता ३ ऐवजी ४ मेची मुदत दिली आहे. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला सणात विष कालवायचे नाही. मात्र ४ मेपासून ऐकणार नाही. ज्या मशिदींवर भोंगे असतील, त्यांच्या समोर लाऊडस्पीकर लावून दुप्पत आवाजात हनुमान चालीसा म्हणा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: