
राज ठाकरेंची २२ मे रोजी पुण्यामध्ये सभा होणार आहे. मात्र या सभेनंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे. डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच राज ठाकरे दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र डॉक्टरांचा नकार असेल तर हा दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. राज यांची तब्बेतीच्या कारणास्तव दौरा पुढे ढकलला जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी राज अचानक पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईत परत आले होते. हा दौरा अर्धवट सोडून परत येण्यामागे राज यांना पायाला झालेल्या दुखापतीचं दुखण्याने पुन्हा डोकं वर काढल्याचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. एक ते दीड वर्षांपूर्वी राज यांच्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीसंदर्भात मध्यंतरी त्यांनी उपचार घेतले होते. मात्र आता हा त्रास त्यांना पुन्हा सुरु झालाय.
तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार बृजभूषण सिंह (MP Brijbhushan Singh) यांनी देखील राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे देखील राज यांच्या या दौऱ्यापूर्वी अनेक चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील सभेनंतर राज डॉक्टरांचा पुन्हा सल्ला घेणार आहेत. सल्ल्यानुसार दौऱ्यासंदर्भातील आखणी केली जाईल. डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिला की त्यांनी अयोध्या दौरा करावा तर ते दौऱ्यावर जातील. डॉक्टरांच्या सल्ल्यावर सर्व अवलंबून आहे. त्यानुसारच राज निर्णय घेतील, असं सांगण्यात येत आहे.