मोठी बातमी ! सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक

0 396
 नांदेड –   राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Public Works Minister Ashok Chavan) यांच्या नांदेड (Nanded) येथील निवासस्थानी अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती समोर अली आहे. हि दगडफेक एका अनोळखी महिलने केली असल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेने दगडफेक केली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. दगडफेक करणारी महिला कोण होती याची माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र ही महिला मनोरुग्ण असल्याचं बोललं जात आहे. या महिलेने केलेल्या दगडफेकीत अशोक चव्हाण यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनची काच फुटली आहे. या दगडफेकीत कुणालाही दुखापत झालेली नाहीये. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे पण पहा –  आमदार निलेश लंके यांच्या कामाचं राज्यमंत्री आदिती तटकरेंकडून कौतुक

दगडफेकीच्या या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ज्यावेळी या महिलेने दगड भिरकावण्यास सुरुवात केली त्यावेळी सुरक्षारक्षकांनी तिला रोखले. मात्र, एक दगड हा थेट सुरक्षा रक्षकांच्या केबिनवरील काचेवर लागला आणि काच फुटली. या महिलेने दगडफेक का केली या संदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान अशोक चव्हाणांच्या घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

भाजप नगराध्यक्षाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार , अश्लील चाळे केल्याचा आरोप

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: