मोठी बातमी ! देशात वीज संकट वाढला: ‘या’ १० राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा

0 241
Big news! Power crisis intensifies in the country: Coal shortage in 'these' 10 states

 प्रतिनिधी DNA मराठी टीम 

दिल्ली –   राज्यासह संपूर्ण देशात आता विजेचा संकट (Power crisis) वाढत आहे. आत देशातील तब्बल १० राज्यात विजेचा संकट निर्माण झाला आहे. याचा मुख्यकारण म्हणजे या राज्यात मोठ्या प्रमाणात कोळशाचा (Coal) तुटवडा निर्माण झाला आहे.  वाढती वीज मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे अनेक राज्यात भारनियम (load shedding) देखील सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात देखील आता महावितरणने निर्णय घेत भारनियम सुरु केला आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांना कडाक्याच्या उन्हात अडीअडचणीचा सामना करावा लागत आहे. (Big news! Power crisis intensifies in the country: Coal shortage in ‘these’ 10 states)

Related Posts
1 of 2,358
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश भागात एप्रिलमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. देशातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित होण्यास सुरुवात झाली आहे. देशातील प्रमुख औद्योगिक गड असलेल्या महाराष्ट्रात अनेक वर्षांनंतर एवढ्या मोठ्या विजेचे संकट उभे राहिले आहे. येथे 2500 मेगावॅट वीज मागणीपेक्षा कमी आहे. राज्यात 28000 मेगावॅटची विक्रमी मागणी असून गतवर्षीपेक्षा 4000 मेगावॅट अधिक आहे. सरकारी आकडेवारीनुसार, झारखंड, बिहार, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये मागणीपेक्षा तीन टक्के कमी वीज उपलब्ध आहे.

या राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा
उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणा.(Big news! Power crisis intensifies in the country: Coal shortage in ‘these’ 10 states)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: