मोठी बातमी ! पोलिसांकडून तब्बल ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त..,

0 250

गांधीनगर-   मागच्या काही दिवसापूर्वी गुजरात (Gujarat) मधील कच्छ (Kutch) बंदरावर कोट्यवधींचे ड्रग्ज (Drugs) जप्त केल्याची माहिती समोर आली होती ही घटना ताजी असताना आता परत एकदा गुजरात पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधात सुरु केलेल्या मोहिमेला मोठा यश  मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३०० कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत.हे ड्रग्ज पाकिस्तानातून समुद्रीमार्गे गुजरातमध्ये आणले जात होते अशी देखील माहिती समोर आली आहे . (Big news! Police seize drugs worth Rs 300 crore)

बुधवारी  द्वारका जिल्ह्यात ड्रग्जची ही मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. जवळपास ३०० कोटी रुपये किंमतीचे हे ड्रग्ज असल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ड्रग्जची १९ पाकिटं जप्त केली होती. त्यांची किंमत सुमारे ८८ कोटी रुपये इतकी होती. त्यानंतर जवळपास ड्रग्जची ४७ पाकिटं जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानातून समुद्रीमार्गे हे ड्रग्ज गुजरातमधील किनारी भाग असलेल्या द्वारकामध्ये आणले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Related Posts
1 of 1,608
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सज्जाद (वय ४४) याला पकडण्यात आले. ठाण्यातील मुंब्रा येथील रहिवासी आहे. त्याच्या बॅगमध्ये ड्रग्जची पाकीट सापडली. त्यात ६.६ किलो एम़ी आणि ११.४ किलो हेरॉइन सापडलं. त्याच्याकडून एकूण तीन बॅग होत्या. त्याची चौकशी केली असता, सज्जाद हा भाजीविक्रेता आहे. सलीम याकुब करा आणि अली याकुब करा या जामनगरमध्ये राहणाऱ्या दोघांनी त्याला ड्रग्ज दिले. पोलिसांनी त्यांच्या घरी छापेमारी केल्यानंतर आणखी ४७ पाकिटं सापडली.(Big news! Police seize drugs worth Rs 300 crore)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: