DNA मराठी

मोठी बातमी ! नरेंद्र मोदी, उद्धव आणि राज ठाकरे येणार एकाच मंचावर अनेक चर्चांना उधाण

0 311
Big news! Narendra Modi, Uddhav and Raj Thackeray will come on the same platform

मुंबई –  सध्या राज्याचा राजकारणात मनसे (MNS) आणि भाजपने (BJP) हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे राज्याचा पारा चांगलंच तापलं आहे. यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Chief Raj Thackeray) हे उद्या एकाच मंचावर एकत्र येणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार सोहळा उद्या म्हणजेच 24 एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे, हा एक नोंदणीकृत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट असून मंगेशकर कुटुंबीयांनी 32 वर्षांपूर्वी स्थापन केला आहे. प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार 24 एप्रिल 2022 रोजी मुंबईतील श्री षण्मुखानंद हॉल, येथे आयोजित करण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर यांचा 24 एप्रिल हा स्मृतीदिन असून त्यानिमित्ताने या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता दीदींच्या निधनाने आमच्या कुटुंबावर सर्वात मोठा दुःखद प्रसंग कोसळला. कुटुंब आणि ट्रस्ट (कुटुंबातील सर्व सदस्य प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत). प्रतिष्ठानने भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीपासून पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” म्हणून ओळखला जाईल, आणि दरवर्षी दीनानाथजींच्या स्मृतीदिनी म्हणजे 24 एप्रिल रोजी प्रदान केला जाणार आहे.
 
यंदा मास्टर दीनानाथजींचा 80 वा स्मृती दिन आहे. त्यानिमित्त “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” ची घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार दरवर्षी देशासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या फक्त एकाच व्यक्तीला दिला जाईल. हा पहिला पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. उषा मंगेशकर या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.
Related Posts
1 of 2,482
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: