मोठी बातमी ! नारायण राणेंना अटक होणार? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0 439
 नाशिक –  नुकतेच केंद्रीय मंत्री झालेल्या नारायण राणे (Narayan Rane) यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले असून नाशिक पोलिसांचा एक पथक चिपळूणला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नाशिक मधील शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचयाविरोधात तक्रार दिली असून या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत अटकेचे आदेश दण्यात आले आहेत. (Big news! Narayan Rane to be arrested? Learn the whole case)
गुन्ह्याची गंभीरता, व्यापकता लक्षात घेता नारायण राणे यांना तात्काळ अटक करून कोर्टासमोर उपस्थित करणं आवश्यक आहे. यासाठी पोलीस उप-आयुक्त दर्जा अधिकार नेमणे उपयुक्त असल्यामुळे पोलीस उप-आयुक्त संजय बारकंडू यांना नारायण राणेंना अटक करण्यासाठी नेमलं आहे. तसेच त्यांना एक पोलिसांचे पथक तयार करून नारायण राणेंना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. तसंच आदेशात पुढे म्हटलं आहे की, गुन्ह्यातील आरोपी हे राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे संसदेच (Rules Of Procedure And Conduct Of Business चे Rule 222 A ) प्रमाणे चेअरमन आणि उपराष्ट्रपती यांना कळविणे बंधनकारक आहे. त्यामुळे पोलीस उप-आयुक्त संजय बारकुंडे यांनी नारायण राणे यांच्या अटकेनंतरची माहिती उपराष्ट्रपतींना कळवावी.
Related Posts
1 of 1,518

 प्रकरण काय 

नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रायगडमधील महाड येथे नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती, असं नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) देखील उपस्थित होते.

महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.(Big news! Narayan Rane to be arrested? Learn the whole case)

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: