मोठी बातमी ! मुंबई उच्च न्यायालयाने दिला एसटी कामगारांना अल्टिमेटम; म्हणाले ..

0 326
Bodies to be exhumed after 'that' controversial encounter; Find out what the case is
प्रतिनिधी DNA मराठी टीम  
मुंबई  –  विलीनीकरणसह आपल्या विविध मागण्यासाठी मागच्या पाच महिल्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employees) मुद्द्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठी निर्णय देत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत पुन्हा एकदा कामावर रुजू होण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या या अल्टिमेटममुळे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, तोपर्यंत कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळ कारवाई करू शकते, असं न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता १५ एप्रिल पर्यंत कामावर हजार न झाल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याची त्रिसदस्यीय समितीने केलेली शिफारस मान्य करण्यात आल्याचे राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्याचबरोबर दाखल केलेली अवमान याचिका मागे घेण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवली. मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करून प्रयत्न सुरू केल्याकडे लक्ष वेधले. त्याच वेळी दोन्ही बाजू, विशेषत: संपकरी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकायचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. परंतु संपकरी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवली होती. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
Related Posts
1 of 2,358

दरम्यान, कामगारांना कामावरून न काढण्याविषयी न्यायालयाने महामंडळाला सूचना केली. सर्वांना पुन्हा सामावून घ्या, त्यांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकून त्यांच्या जगण्याचे साधन हिरावून घेऊ नका, असं न्यायालयाने नमूद केलं. मात्र, तरी देखील १५ तारखेपर्यंत कामावर रुजू न झाल्यास महामंडळ कारवाईसाठी मोकळे असल्याचं न्यायालयाने नमूद केलं.तसेच न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांची देखील समजूत काढली आहे. संपकरी कामगारांनी तातडीनं कामावर रूजू व्हावे. तुमच्या समस्या शांतपणे ऐकल्या आहेत. आम्ही कधीही तुमच्यावर कारवाईचे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे आतातरी कामावर रुजू व्हा, असं न्यायालयाने यावेळी सांगितलं.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: