मोठी बातमी ! खासदार नवनीत राणांना जिवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

0 273
Big news! MP Navneet Rana threatened to kill; Filed a crime

 

मुंबई –  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याप्रकरणी चर्चेत आलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नवनीत राणा यांना आता जीवे मारण्याची धमकी मिळालयाने सध्या खासदार नवनीत राणा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. जीवे मारण्याची धमकी मिळाल्याप्रकरणी नवनीत राणा यांनी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

 

त्यांनी दिल्ली पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी संध्याकाळी 5.27 ते 5.47 या दरम्यान त्यांना 11 वेळा कॉल करण्यात आला. त्यांनी बुधवारी पोलिसांना फोनवरून धमकी आल्याचे सांगितले. मंगळवारी सायंकाळी राणांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर हे फोन कॉल्स करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. राणांच्या म्हणण्यानुसार, कॉलरने त्यांच्याशी बोलताना अपशब्द वापरले, शिवीगाळ केली आणि महाराष्ट्रात परत गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

 

 

हनुमान चालिसा वाचाल तर मारले जाल
तू पुन्हा हनुमान चालिसा वाचलीस तर तुला मारून टाकू, अशी धमकीही राणांना दिली होती. याप्रकरणी दिल्लीच्या नॉर्थ एव्हेन्यू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या धमकीनंतर राणा या घाबरल्या असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खासदारांची तक्रार प्राप्त झाली असून, कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मुंबईतील शिवसेना मुख्यालय ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा वाचण्याच्या आवाहनाप्रकरणी राणा यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

Related Posts
1 of 2,139
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: