मोठी बातमी ! आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

0 2,826

सांगली  – भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार  गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर  जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल  आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हा गुन्हा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने दाखल केला आहे.  राजू नानासो जानकर या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदार पडळकर आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Big news! MLA Gopichand Padalkar charged with attempted murder)

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून आमदार गोपीचंद पडळकर  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  राजू नानासो जानकर  यांना  आमदार पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी रविवारी सायंकाळी आटपाडी पोलीस ठाण्यासमोर गाडी अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सध्या आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर आणि महाविकास आघाडीत संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजू जानकर यांचे मेहुणे शिवसेनेच्या उमेदवारास मदत करीत असल्याच्या रागातून आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी मारहाण केल्याचा दावा जानकर यांनी केला आहे.
Related Posts
1 of 1,518
याबाबत विचारणा केली असता, आमदार पडळकर यांनी दमदाटी केली, तसेच आटपाडी पोलीस ठाण्यासमोर येण्याचं आव्हान दिलं. त्यानंतर आटपाडी पोलीस ठाण्यासमोर आलेले राजू जानकर यांच्या अंगावर गाडी घालून आमदार पडळकर यांनी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जानकर यांनी केला आहे.
जानकर यांच्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह गणेश भुते या दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.(Big news! MLA Gopichand Padalkar charged with attempted murder)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: