मोठी बातमी! LIC कार्यालयाला आग; अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई – मुंबई (Mumbai) मधील सांताक्रुझ (Santa Cruz) परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसेच आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
इमारतीला आग लागल्याचं लक्षात येताच कामगारांनी याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक विभागाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे एलआयसी कार्यालय परिसरात काही काळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.