मोठी बातमी ! मालगाडी रुळावरून घसरून मोठा अपघात, चालक आणि गार्ड सुरक्षित

0 262

कानपूर-    उत्तर प्रदेशाच्या कानपूर (Kanpur) मधील ग्रामीण भागात दि. १५ ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी एक मालगाडी रेल्वे रुळावरून खाली घसरल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंबियापूर रेल्वे स्टेशन (Ambiyapur Railway Station) च्या जवळ हा अपघात (Accident) घडला आहे.  सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांसोबतच जीआरपी पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.  (Big news! Large accident due to derailment, driver and guard safe)

नवी दिल्ली – हावडा रेल्वे रुळाच्या समांतर उभारण्यात आलेल्या फ्रेट कॉरिडोर ट्रॅकवर ही मालगाडी घसरून ही दुर्घटना घडली. यामुळे जवळपास १०० मीटरपर्यंत डीएफसी ट्रॅकला तडा गेल्याचं समोर येतंय.कानपूरला निघालेल्या मालगाडीला अंबियापूर रेल्वे स्टेशनजवळ अपघात झाला. गाडीचा वेग अधिक असल्यानं रेल्वे ट्रॅकलाही याचा फटका बसलाय. चालकानं मालगाडी रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला परंतु, मालगाडीतील सामान एकमेकांवर धडकलं आणि पाहता पाहताच रुळावरून मालगाडी खाली घसरली. यामुळे काही सामान बाजुलाच असलेल्या तलावातही फेकलं गेलं.
Related Posts
1 of 1,481
अपघातात चालक आणि गार्ड सुरक्षित आहेत. त्यांनीच या अपघाताची माहिती त्वरीत कंट्रोल रुमला दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ या मार्गावरचं रेल्वे संचालन बंद केलं. या अपघातानंतर मार्गावरून प्रवास करणाऱ्या जवळपास २१ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.(Big news! Large accident due to derailment, driver and guard safe) 
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: