मोठी बातमी ! ‘त्या’ प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाला क्लीन चिट

0 209
Big news! In that case, clean chit to Shah Rukh Khan's son

 

 

मुंबई  –  ड्रग-ऑन-क्रूझ प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खान वगळता चार जणांच्या नावांचा समावेश आहे. म्हणजेच एजन्सीने आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग ऑन क्रूझ प्रकरणात गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुरेशा पुराव्याअभावी आर्यन खान, एविन साहू आणि इतर 4 आयोजकांविरुद्ध ड्रग्ज प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर 2021 च्या सुरुवातीला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती.

 

 

Related Posts
1 of 2,179

अनेक न्यायालयीन सुनावणी, प्रचंड नाट्य आणि 26 दिवसांच्या प्रदीर्घ कोठडीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने 28 ऑक्टोबरला त्यांना जामीन मंजूर केला. आता अखेर त्याला एनसीबीकडून क्लीन चिट मिळाली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: