मोठी बातमी ! गुटखा चोरीचे फोटो माध्यमाच्या हाती; अनेक चर्चांना उधाण

0 277
Big news! Gutkha theft photos in the hands of the media; Many discussions abound
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यात काष्टी श्रीगोंदा रोडवर हॉटेल अनन्या नजीक गुटखा (Gutkha) लूट प्रकरणी काही संघटनांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना निवेदने दिली असताना गुटखा चोरीतील काही फोटो प्रसार माध्यमाच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा काष्ठी रोडवर हॉटेल अन्यन्या च्या परिसरात गुटखा वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी लुटला असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असताना यात केलेला आरोपी उमेश वेताळ याने वकिलाच्या दालनात बोलताना सांगितले की मी समीर सय्यद व सद्दाम पठाण याना ओळखत नाही काही पोलिसांच्या सांगण्यावरून मी समीर सय्यद व सद्दाम पठाण यांची नावे घेतली आहे गुटखा चोरी प्रकरणात त्यांचा काही एक संबंध नाही असेही त्याने बोलताना सांगितले.
Related Posts
1 of 2,326
 त्यानंतर अवघ्या काही काळातच माध्यम प्रतिनिधी यांना गुटखा चोरीचे फोटो मिळाले ते फोटो त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना पाठवले आहेत त्यात गाडी न तसेच गुटखा वाहतूक करणाऱ्या काही लोकांचे चेहरे दिसत आहेत त्यामुळे आता पोलीस लवकरात लवकर दोषी पोलिसांवर कारवाई करतील अशी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात चर्चा ऐकण्यास मिळत आहेत.
पोलिसाने रसद देऊन निवेदन द्यायला लावल्याची चर्चा 
गुटखा प्रकरणात दोषी असणाऱ्या पोलिसाने एका संघटनेच्या पदाधिकारी याना रसद पुरवून आपल्यावरील आलेले संकट इतर पोलिसांवर ढकलून त्यांचा यामध्ये सहभाग आहे असें भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यातही दोषी पोलीस अपयशी ठरला आहे अशी जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: