मोठी बातमी ! ईडीची संजय राऊतांवर मोठी कारवाई; ‘इतके’ फ्लॅट जप्त

0 371
Big news! ED takes major action against Sanjay Raut; 'So much' flat confiscated
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
मुंबई – राज्यात ईडीने (ED) मोठी कारवाई करत शिवसेना (Shiv Sena) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.  संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. यापूर्वी देखील फेब्रुवारी २०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत अटक केली होती. यानंतर काहीच दिवसांपूर्वीच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्यावर देखील ईडीने कारवाई करत त्यांची काही संपत्ती जप्त केली आहे. संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्याने राज्यात राजकीय पारा चांगलाच तापण्याची शक्यता असून पुन्हा एकदा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु होण्याची शक्यता आहे.  (Big news! ED takes major action against Sanjay Raut; ‘So much’ flat confiscated)
Related Posts
1 of 2,453

 मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीनं कारवाई केली असल्याचं सांगितलं जात आहे. (Big news! ED takes major action against Sanjay Raut; ‘So much’ flat confiscated)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: