मोठी बातमी! अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड; अटक होणार का ?

0 217
Big news! ED raid on Anil Parab's house; will he be arrested?

 

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा सक्तवसुली संचलनालयान (ED) चर्चेत आले आहे. नवाब मलिक (Nawab Malik) नंतर पुन्हा एकदा ईडीने आज सकाळी महाविकास आघाडी सरकारमधील (MVA) एका मोठ्या नेत्याच्या घरी धाड टाकली आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरी  ईडीने धाड टाकली आहे. त्याचबरोबर अनिल परब यांच्या पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी करत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार ही धाड मनी लाँड्रिंग प्रकरणात टाकली आहे . आज सकाळी ईडीचे अधिकारी अनिल परब यांच्या  वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहे. अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमधील एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे राज्यात आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे . तसेच या कारवाईनंतर त्यांना अटक होणार का ? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाला आहे.

 

 

अनिल परबांना तुरूंगात जावे लागणार – किरीट सोमय्या

Related Posts
1 of 2,208

परिवहन मंत्री अनिल परब यांनाही आता तुरूंगाची हवा खावी लागेल. त्यांनी आता त्यासाठी तयार रहावे, असा इशारा भाजपाचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिला आहे.  सोमय्या यांनी परब यांच्या विरोधात विविध पातळ्यांवर तक्रारी नोंदविल्या असून ईडीने त्यासंदर्भात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेही परब यांना पैसे दिल्याचा जबाब दिला आहे.

 

 

सोमय्या म्हणाले कि, बेनामी मालमत्ता, आर्थिक अफरातफर (मनी लाँड्रिंग), बोगस (शेल) कंपन्या, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारी आणि फेमा कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघनासाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरूंगात गेले. आता परब यांची वेळ आली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: