मोठी बातमी ! काँग्रेस हायकमांडचा मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याचा आदेश

0 3,801

चंदीगड –   काँग्रेसचे (Congress) पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Chief Minister Amarinder Singh) यांच्यात सुरु असलेल्या वादात काँग्रेस हायकमांड (Congress High Command) ने मोठा निर्णय घेत मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहे.   याशिवाय संध्याकाळी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन नेत्याची निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच दरम्यान मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते खासदार मनीष तिवारी आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी चर्चा देखील केल्याची माहिती समोर आली आहे. अमरिंदर सिंग यांनी आधी जर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले गेले तर ते पक्षही सोडतील असेही सांगितले होते.(Big news! Congress High Command orders resignation of Chief Minister)

काँग्रेस हायकमांडने सर्व प्रयत्न करूनही अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील राजकीय वाद संपू शकले नाही. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर पंजाब काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्वाच्या बदलाची चर्चा चंदिगढमधील आमदारांच्या बैठकीत तीव्र झाली आहे. शनिवारी होणाऱ्या आमदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी याबाबत सोनिया गांधीकडे भाष्य केलं आहे. अशा अपमानासह काँग्रेसमध्ये राहू शकत नाहीत, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटल्याचे बोलले जात आहे.अमरिंदर सिंग यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना सांगितले आहे, असा अपमान पुरेसा आहे,हे तिसऱ्यांदा होत आहे. मी अशा अपमानाने पक्षात राहू शकत नाही.

गेल्या काही महिन्यांत नवज्योतसिंग सिद्धू यांचे समर्थक समजल्या जाणाऱ्या आमदारांच्या एका गटाने अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारले असून नव्या नेत्याची मागणी केली आहे. सुनील जाखड़, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रताप सिंह बाजवा आणि बेअंत सिंह यांचे नातू आणि खासदार रवनीत सिंह बिट्टू अशी नावे पंजाबच्या संभाव्य नवीन मुख्यमंत्र्यासाठी लढत आहेत.

राजकारणात कायमस्वरूपी मित्रही नसतो आणि शत्रूही नसते त्यामुळे ….   विखे पाटील

Related Posts
1 of 1,388

पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळा दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) शनिवारी राज्याच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. एआयसीसीचे सरचिटणीस आणि पंजाब प्रभारी हरीश रावत (Harish Rawat) यांनी शुक्रवारी रात्री ही घोषणा केली होती.  (Big news! Congress High Command orders resignation of Chief Minister)

हे पण पहा – भाजपा मधील अनेक जण महाविकासआघाडी मध्ये येण्यास तयार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: