मोठी बातमी ! नांगरे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

0 631

 नवी मुंबई –  राज्यातील काही चर्चित पोलीस अधिकार्यांपैकी एक असणारे मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे (BJP)नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (National Human Rights Commission) आपल्या घरात दाबून ठेवल्याची तक्रार केली आहे.

मागच्या काही दिवसापूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते.  त्यानंतर किरीट सोमय्या कोल्हापूरला येत होते.त्या दिवशी विश्वास नांगरे (Nangre Patil) पाटील यांनी बेकायदा घरात डांबून ठेवले. तसेच रेल्वेत बसण्यास मज्जाव केला होता तसेच विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या अधिकाराचा वापर भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यासाठी केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हे पण पहा  – Ahmednagar | सफर चंद्रा वरची | Ride is on the moon

Related Posts
1 of 1,640

नांगरे पाटील यांनी घोटाळेबाजांना वाचविण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला असून आपल्याला घरात सहा तास डांबून ठेवल्याचे सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच कागल तालुक्यातील मुरगूड येथे येऊन तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सोमय्या यांनी कोल्हापूर दौरा निश्चित केला होता. परंतु कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur police) बंदोबस्त पुरविण्यास असमर्थता दर्शवित सोमय्या यांना कोल्हापूर बंदी केली होती. त्या दिवशी सोमय्या यांनी एक व्हिडिओ प्रसारित करुन आपल्या घरासमोर मोठा बंदोबस्त तैनात केल्याचे सांगितले होते.

लग्नला झाले अवघ्या 10 दिवस अन् नवरी आठ महिन्यांची गरोदर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: