मोठी बातमी! तब्बल पाच कोटींचा गांजा जप्त, एनसीबीची करवाई

0 311

नवी मुंबई – कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणानंतर आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या ‘एनसीबी’ (NCB) च्या मुंबई पथकाने सोमवारी नांदेडमध्ये धडक कारवाई करीत तब्बल १ हजार १२७ किलो गांजा (Cannabis) जप्त केला आहे. याची बाजारातील किंमत सुमारे पाच कोटी आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.(Big news! Cannabis worth Rs 5 crore seized, action taken by NCB)

‘एनसीबी’कडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात नांदेड-हैदराबाद मार्गावर नायगाव, मंजराम येथे सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास ही कारवाई केली आहे. स्थानिक पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने ‘एनसीबी’च्या पथकाने एम. एच. २६ एडी २१६५ क्रमांकाचा ट्रक अडवला. या ट्रकमध्ये लोखंडी सळ्यांच्या आत तब्बल ४४ गोण्यांमध्ये हा गांजाल पवून आणण्यात आला होता.

गांजाची ही खेप आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून येत होती. हा गांजा नांदेडमधून पुढे जळगाव आणि नंतर राज्यभरात वितरित केला जाणार होता.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता होणार सूर्यास्तानंतर शवविच्छेदन

Related Posts
1 of 1,608

‘एनसीबी’ने याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. हा माल कोणी पाठविला होता आणि कोणाकोणाला पोहोचवला जाणार होता, याचा तपासही सुरू केला आहे.(Big news! Cannabis worth Rs 5 crore seized, action taken by NCB)

हे पण पहा- दंगल भडकवण्यामागे अनिल बोंडेचा हात – नवाब मलिक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: