DNA मराठी

मोठी बातमी! शंकरराव गडाख पीए गोळीबार प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक

0 456

अहमदनगर – राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांचे पीए राहुल राजळे (PA Rahul Rajale) यांच्यावर मागच्या आठवडयात गोळीबार करण्यात आला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने करवाई करत संतोष उत्तम भिंगारदिवे ( रा. घोडेगाव ता. नेवासा) याला अटक केली आहे. या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री लोहगाव परिसरात राजळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी विकास राजळे यांच्या फिर्यादीवरून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरूवातीला आरोपी नितीन शिरसाठ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

Related Posts
1 of 2,448

आता भिंगारदिवे याला पुण्यातून अटक केली आहे. बबलू लोंढे व ऋषिकेश शेटे अद्यापही पसार आहेत. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास आता पोलीस उपअधीक्षक मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: