मोठी बातमी! आमदार संग्राम जगताप यांच्या वाहनाचा अपघात..

0 378
Big news! Accident of MLA Sangram Jagtap's vehicle ..

 

अहमदनगर : अहमदनगर शहराचे (Ahmednagar) आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते (NCP) संग्राम जगताप (Sangram jagtap)यांच्या बीएमडब्ल्यू कार (BMW) आणि एसटीचा (ST) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai – pune expressway) समोरासमोर धडक झाल्याची माहिती समोर आली आहे.या अपघातात आमदार संग्राम जगताप अपघातात बालबाल बचावले आहेत. अपघाताच्या वेळी गाडीमध्ये जगताप आणि चालक दोघेच होते.

मिळालेल्या माहितीनुसार रसायनी जवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला असून जगताप यांच्या कारचा मोठा नुकसान झाला आहे. आमदार जगताप सुखरुप असून मुंबईत पोहोचले आहे.

 

रात्रीची वेळ असल्याने आमदार जगताप झोपेत होते. मुंबईच्या जवळ गेल्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी लेन खोदून रस्ता वळवला आला. जगताप यांच्या गाडीच्या पुढे एक एसटी बस जात होती. ती तिसऱ्या लेनमधून जात होती. मात्र पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर एसटी चालकाने अचानकपणे लेन बदलून गाडी थेट पहिल्या लेनमध्ये आणली. त्यावेळी त्या लेनमधून जगताप यांचे वाहन भरधाव वेगाने जात होते. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांचा चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कार बसवर मागील बाजूने धडकली.

 

Related Posts
1 of 2,358

दरम्यान, या अपघातात जगताप यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सीट बेल्ट आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे जगताप आणि त्यांच्या चालकाला दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती कळताच पोलीस मदतीला आले. मुंबईला पुढे गेलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्यांना मागे बोलवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वाहनातून जगताप पुढे रवाना झाले.

 

जनतेच्या प्रेमामुळे आपण सुखरूप असून नगरच्या नागरिकांना काळजी करू नये, असं जगताप यांनी म्हटलं आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: