
अहमदनगर शहर व जिल्ह्यात १४ एप्रिल रोजी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व महावीर जयंती’, १५ एप्रिल रोजी ‘गुड फ्रायडे’, १६ एप्रिल रोजी ‘हनुमान जयंती’ व १७ एप्रिल रोजी ‘ईस्टर संडे’ हे सण / उत्सव साजरे केले जाणार आहेत. सदर उत्सवाच्या दरम्यान गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जिल्हयामध्ये विविध राजकीय पक्ष कामगार संघटना तर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा, धरणे आंदोलने, रास्ता रोको होतात. त्याचप्रमाणे सध्या जिल्हयात यात्रा उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रम साजरे होतात त्यावेळी मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वरील पार्श्वभूमीवर जिल्हयात कोणत्याही किरकोळ घटना वरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंबहुना तशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी पोलीसांना मदत व्हावी म्हणून संपूर्ण अहमदनगर शहर व जिल्ह्यात १४ एप्रिल ते १७ एप्रिल २०२२ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी जारी करण्यात आले आहेत.
हा आदेश खालील व्यक्तींना लागू होणार नाहीत