प्रतिनिधी DNA मराठी टीम
परभणी – नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार औरंगाबाद (Aurangabad) जिल्यातील दौलताबाद स्टेशनजवळ (Daulatabad station) मालवाहू मालगाडीचे डब्बे रेल्वे रुळावरून घसरले आहे. त्यामुळे परभणी रेल्वे स्थानकावरुन मनमाडकडे धावणार्या नऊ गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड (Nanded) विभागाकडून देण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार दौलताबाद रेल्वे स्थानकावर मालवाहू नेणार्या मालगाडीचे पाच डब्बे रेल्वे रुळावरुन कोसळले या अपघातामुळे मेन लाईन बंद झाली आहे. त्यामुळे परभणी रेल्वे स्थानकावरुन धावणार्या गाड्या रद्द करण्याचा निणर्य घेण्यात आला आहे. परभणी रेल्वे स्थानकावरुन धावणारी हैद्राबाद – औरंगाबाद गाडी परभणी ते औरंगाबाद, औरंगाबाद – हैद्राबाद गाडी औरंगाबाद ते परभणी दरम्यान, निजामाबाद – पुणे दरम्यान, मनमाड – नांदेड, रेनीगुंठा ते नांदेड दरम्यान, धर्माबाद – मनमाड, औरंगाबाद ते मनमाड दरम्यान, मनमाड – धर्माबाद गाडी मनमाड ते औरंगाबाद दरम्यान, काचिगुडा – रेनीगुंठा गाडी नांदेड ते रेनीगुंठा दरम्यान, रेनीगुंठा ते काचिगुडा गाडी पोटुल ते नांदेड दरम्यान आणि नरसापुर – नगरसोल गाडी औरंगाबाद ते नगरसोल दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
नऊ गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर नांदेड ते अमृतसर गाडी तीन तास उशिरा आणि नांदेड ते मुंबई गाडी तीन तास उशिरा, नगरसोल – नरसापुर गाडी तीन तास उशिराने धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मुंबई-नांदेड आणि अमृतसर – नांदेड गाडीचा मार्ग बदलण्यात आला असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून सांगण्यात आले आहे.(Big news! 9 trains to Pune, Aurangabad canceled due to ‘this’ reason)