मोठी बातमी..’या’ महिन्यात होणार 14 महापालिकांच्या निवडणुका?

0 225
By-Poll Results 2022: BJP pushed in the country; Congress, RJD-TMC's big lead

 

मुंबई – मागच्या काही महिन्यांपासून राज्यातली 14 महापालिकांच्या निवडणुका (municipal corporation election) रखडले आहे मात्र आता या महापालिकांचा निवडणुकी बद्दल मोठी माहिती समोर आली आहे. येत्या जुलै ते ऑक्टोबर दरम्यान हे निवडणुका पार पडू शकतात असा अंदाज सध्या राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

 

सर्वोच्च न्यायालयात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर पार पडलेल्या सुनावणीत राज्य सरकारनं केलेला कायदा फेटाळला आणि 15 दिवसात निवडणुका जाहीर करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लवकरच 14 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. 31 मेपर्यंतची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचंही समजतंय.

 

यासर्व घडामोडीनंतर राज्यात होणाऱ्या 14 महापालिका निवडणुकांच्या तारखांबाबत पहिल्यांदाच राज्य निवडणूक आयोगानं संकेत दिलेत. येत्या जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिकेसह 14 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 9 महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच संभाव्य तारखांबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून (SEC) संकेत मिळाले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचं आयुक्तांना पत्र.

 

प्रलंबित महापालिका निवडणुका

Related Posts
1 of 2,208

मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती या 14 शहरांतील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

 

जिल्हा परिषदांच्या प्रलंबित निवडणुका

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहे. यातल्या काही जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

 

 

राज्य निवडणूक आयोगानं 14 नागरी संस्थांच्या महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलं आहे की, स्थानिक-स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तीन टप्पे आहेत. प्रभाग आणि आरक्षण सोडत, निवडणूक आयोगानं तयार केलेली विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी जाहीर करणं आणि तिसरी पायरी म्हणजे निवडणूक. 14 महापालिकांची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. तसंच या निवडणुकीसाठीची मतदार यादी 7 जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: