” उत्तर प्रदेश निवडणुकांआधी होणार बड्या हिंदू नेत्याची हत्या”

0 323

नवी दिल्ली –   केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी ( Farm Laws ) कायद्याविरोधात मागच्या नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून देशाची राजधानी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकेत ( Rakesh Tikait ) यांनी परत एकदा भारतीय जनता पक्ष (BJP) आणि केंद्रसरकारवर जोरदार टीका केली आहे.  भाजपपेक्षा घातक कोणताच पक्ष नाही  उत्तर  प्रदेश निवडणुकांआधी (Uttar Pradesh elections) एखाद्या मोठ्या हिंदू लिडरची हत्या होऊ शकते. अशी शंका त्यांनी भाजपावर टीका करताना केली आहे. (“Big Hindu leader to be assassinated before Uttar Pradesh elections”)

हरियाणाच्या सिरसा मध्ये शेतकरी संमेलनाला पोहोचलेले भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकेत यांनी भाजप सरकारवर मोठा आरोप केला. टिकेत म्हणाले, की यूपी निवडणुकांच्या आधी एखाद्या मोठ्या हिंदू लिडरची हत्या होणार आहे. ते म्हणाले, की यांच्यापासून सावधान राहा आणि हे एका मोठ्या हिंदू लिडरची हत्या करून देशात हिंदू-मुसलमान या मुद्द्यावरुन निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत.
Related Posts
1 of 1,640

राकेश टिकेत म्हणाले, की भाजपपेक्षा धोकादायक इतर कोणता पक्ष नाही. ज्या लोकांनी भाजपची निर्मिती केली, आज त्यांनाही घरात कैद करून ठेवण्यात आलं आहे. टिकेत म्हणाले, की या देशावर सरकारी तालिबानींचा कब्जा आहे. त्यांनी असा आरोप केला, की ज्या SDM नं शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्यांचे चुलते RSS मध्ये मोठ्या पदावर आहे. हे आम्हाला खालिस्तानी म्हणत असतील तर आम्ही यांना तालिबानी म्हणू.

तलवारीचा धाक दाखवून प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न , आरोपीला अटक

पुढे राकेश टिकेत म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं, की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल. मात्र, असं झालं नाही आणि शेतमालालाही दुप्पट भाव मिळाला नाही. यासोबतच टिकेत म्हणाले, की देशातील मोठ्या कंपन्या कर्ज घेऊन ते माफ करून घेतात आणि नंतर याच कंपन्या सरकारी संस्थान खरेदी करतात. मात्र, एखादा शेतकरी कर्ज घेऊन ते भरू शकला नाही तर त्याचं घर आणि जमिनही लिलावासाठी काढली जाते. कर्ज 10 लाखाचं असलं तरीही शेतकऱ्याची 50 लाखाची जमीन विकली जाते. हा कसला कायदा आहे, असा सवालही त्यांनी केला. (“Big Hindu leader to be assassinated before Uttar Pradesh elections”)

हे पण पहा –  आमदार निलेश लंके यांच्या कामाचं राज्यमंत्री आदिती तटकरेंकडून कौतुक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: