ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, परमबीर सिंग यांचा वेतन थांबवण्याचा निर्णय

0 218

नवी मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी वसूलाचे आरोप लावून चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या वेतन थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते . त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करत असताना परमबीर सिंग यांच्यावर देखील अनेक आरोप लावण्यात आले आहे.

परमबीर सिंग यांच्या वर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सुरू झाल्याने परमबीर सिंग मात्र अनेक दिवसांपासून बेपत्ता झाले आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर नोटीस लाऊन त्यांना हजर राहण्यास सांगितले होते. मात्र तरीही ते हजर न राहिल्याने आता त्यांना फरार घोषित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी करून घेतला सर्पदंश , अकोले तालुक्यातील अजब कहाणी

Related Posts
1 of 1,640

परमबीर सिंग यांच्यावर मुंबई आणि ठाण्यामध्ये काही गुन्हे सुद्धा दाखल झाले होते. ते मे महिन्यात सुट्टीवर गेले होते, मात्र त्यानंतर ते अद्यापर्यंत परतलेले नाही. तसंच त्यांना त्यांच्या अनुपस्थितीबद्दल गृहविभागाला देखील काहीच कळवलेलं नाही. मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी नोटीस लावून त्यांना हजर राहण्यास सांगितले होतं. मात्र ते हजर राहिलेले नाहीत. अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकारलाही सापडत नसलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा अखेर ठावठिकाणा लागल्याची चर्चा आहे.

DySP संदीप मिटके ॲक्शन मोडमध्ये,हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा

ते सध्या चंदीगडमध्ये असल्याचा अंदाज आहे. परमबीर सिंग यांनी चौकशी आयोगापुढं एक प्रतिज्ञापत्र सादर केलं असून त्याला जोडलेली पॉवर ऑफ अॅटर्नी ही चंदीगड शहरात तयार करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: