मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ! एकाच दिवसात राज्याचा भूगोल बदलला

0 590
Big decision of CM! The geography of the state changed in a single day
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
अमरावती –  आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी (CM YS Jaganmohan Reddy) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी चक्क एकच दिवसात आंध्र प्रदेश राज्यात तब्बल १३ जिल्ह्यांची निर्मिती केली आहे. यामुळे आता आंध्र प्रदेशमध्ये २६ जिल्हे झाले आहे. वाय एस जगनमोहन रेड्डी नेहमी आपल्या धाडसी  निर्णयांसाठी ओळखले जातात.  यापूर्वी आंध्र प्रदेशमध्ये १३ जिल्हे अस्तित्वात होते.  (Big decision of CM! The geography of the state changed in a single day)
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत (In the Assembly elections) त्यांनी जनतेला आश्वासने दिली होती. यामध्ये जिल्ह्यांची संख्या वाढवत प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा वेगळा जिल्हा करण्यात येईल, या आश्वासनाचाही समावेश होता. नव्या जिल्ह्यांची निर्मिती केल्यानंतर वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही फेरबदल केले आहेत. नवनिर्मित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
Related Posts
1 of 2,459
कोणत्या जिल्ह्यात कोण झालं जिल्हाधिकारी?
नव्याने निर्मिती करण्यात आलेल्या कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जे. निवास, गुंटूरमध्ये विवेक यादव, पूर्वी गोदावरी येथे चेवुरी हरीकिरण आणि प्रकाशममध्ये प्रवीण कुमार यांना जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच श्रीकाकुलम येथे श्रीकेश लथकर, सूर्यकुमारी (विजयनगरम), ए मल्लिकार्जुन (विशाखापट्टनम), केवीएन चक्रधर बाबू (नेल्लोर), हरिनारायण (चित्तूर), विजयारामाजू (कडपा), पी कोटेश्वर राव (कुरनूल) आणि एस नागलक्ष्मी (अनथापुरम) यांना जिल्हाधिकारीपदावर कायम ठेवण्यात आलं आहे.(Big decision of CM! The geography of the state changed in a single day)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: