मनिका बात्राला मोठा झटका,ऑलिम्पिकमध्ये पराभूत झाल्यावर आता होणार कारवाई

0 28

नवी दिल्ली – भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बात्रा (Table tennis player Manika Batra) ला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तिच्या पासून संपूर्ण देशाला पदकाची अपेक्षा होती मात्र तिच्या पराभवामुळे ही अपॆक्षा भंग झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये झालेल्या या पराभवानंतर आता मनिकावर भारतीय टेबल टेनिस महासंघाकडून कठोर कारवाई (Table Tennis Federation) होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Big blow to Manika Batra, action will be taken now after losing in the Olympics)

प्रकरण काय 

मनिका जेव्हा टोकियो ऑलिम्पिकमध्ये  खेळत होती तेव्हा तिने राष्ट्रीय प्रशिक्षकांची मदत घेतली नाही तर त्यांच्या जागी तिने स्वतःचे खासगी प्रशिक्षक टोकियोमध्ये दाखल केले होते.  मात्र त्यांना खेळाच्या ठिकाणी आयोजकांनी प्रवेश दिला नाही. मनिका आपले खासगी प्रशिक्षक सन्मय परांजपे यांना घेऊन टोकियो येथे गेली होती. पण सन्मय यांना मनिकाबरोबर सराव करण्याची संधी आयोजकांनी दिली नाही आणि त्याचबरोबर जिथे स्पर्धा होणार होती तिथेही त्यांनी आयोजकांनी प्रवेश नाकारला होता.

भिंगार परिसरामध्ये रात्रीचे वेळी हत्याराचा धाक दाखवून चोऱ्या करणारा आरोपी जेरबंद

Related Posts
1 of 48

तर दुसरीकडे भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक हे सौम्यदीप रॉय आहेत. रॉय यांनी  २०१६ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले होते.  रॉय हे फक्त एकच प्रशिक्षक होते की ज्यांना टेबल टेनिसच्या खेळाडूंबरोबर जाण्याची परवानगी देण्यात आली होती.  पण मनिकाने स्पर्धा सुरु असताना राष्ट्रीय प्रशिक्षक रॉय यांची मदत घेतली नाही. या प्रकरणावरूनच आता मनिकावर कारवाई होणार आहे.  

या प्रकरणावर भारतीय टेबल टेनिस महासंघाचे महासचिव अरुण कुमार बॅनर्जी यांनी सांगितले की, मनिकाने शिस्त पाळलेली नाही, त्यामुळे या बेशिस्त वर्तनामुळे तिच्यावर कारवाई होणार आहे. जेव्हा स्पर्धा सुरु होती तेव्हा तिने राष्ट्रीय प्रशिक्षकांना आपल्या जवळ बसवायला हवे होते आणि त्यांच्याकडून तिने मार्गदर्शन घेणे अपेक्षित होते. काही दिवसांमध्येच टेबल टेनिस महासंघाची बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये मनिकावर कोणती कारवाई करायची, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच या प्रकरणाची सत्यताही समोर येणार आहे.(Big blow to Manika Batra, action will be taken now after losing in the Olympics)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: