भारताला मोठा धक्का ! आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतून “हा” खिलाडी बाहेर

0 97

मुंबई –  भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतुत्वाखाली (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिके विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका (ODI series) खेळणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा झटका लागला आहे.  फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर (Washington sunder)या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याला कोरोनाची लागण झाल्याने तो या मालिकेत दिसणार नाही. (Big blow to India! “This” player out of ODI series against Africa)

बेंगळुरू येथील शिबिरात सुंदरची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे तो आता एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यांच्या जागी जयंत यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.   मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 19 जानेवारीला होणार आहे. याशिवाय सिराजचा बॅकअप म्हणून नवदीप सैनीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. कसोटी मालिकेदरम्यान सिराजला दुखापत झाली. यामुळेच मोहम्मद सिराज कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळत नाहीये. अशा परिस्थितीत, सिराजच्या दुखापतीच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने बॅकअप म्हणून नवदीप सैनीचा वनडे संघात समावेश केला आहे.

Related Posts
1 of 65
 पहिला एकदिवसीय सामना 19 जानेवारीला, दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारीला आणि तिसरा एकदिवसीय सामना 23 जानेवारीला खेळवला जाईल.(Big blow to India! “This” player out of ODI series against Africa)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: