चेन्नईला मोठा धक्का ; ‘हा’ स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर

0 195
'this' players' careers end for CSK! Hard to find a place in the team next season

 

मुंबई – अडीच अडचणीत असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. पुन्हा एकदा संघाला जोरदार धक्का बसला आहे. संघाचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) उर्वरित आयपीएल २०२२च्या हंगामातून बाहेर झाला आहे. या बाबतची माहिती स्वतः संघाचे सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

चेन्नई संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जडेजाला बरगडीची दुखापत झाली आहे. याच कारणास्तव रविवारी (०९ मे) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नईच्या सामन्यासाठी तो उपलब्ध नव्हता. जडेजाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध ४ मे रोजी सामना खेळताना क्षेत्ररक्षणावेळी ही दुखापत (A Rib Injury) झाली होती. तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली होता आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याला आयपीएलच्या उर्वरित हंगामातून वगळण्यात आले आहे.

 

दरम्यान, जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल २०२२ च्या सुरुवातील कर्णधार झाला होता. आयपीएल २०२२ हंगामापूर्वी (IPL 2022) धोनीने (MS Dhoni) चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा जडेजाकडे  सोपवली होती. पण जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तसेच जडेजाची वैयक्तिक कामगिरीही खालावली. त्यामुळे जडेजाने पहिल्या ८ सामन्यात नेतृत्व केल्यानंतर वैयक्तिक कामगिरीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनी पुन्हा कर्णधार झाला.

 

 

जडेजाची निराशाजनक कामगिरी
जडेजासाठी आयपीएल २०२२ हंगाम विसण्यासारखा राहिला. कारण चेन्नई संघ त्याच्या नेतृत्वाखाली ८ पैकी केवळ २ सामने जिंकू शकले. तसेच त्याची वैयक्तिक कामगिरीही फारशी बरी झाली नाही. त्याने आयपीएल २०२२ मध्ये १० सामने खेळले असून ११६ धावा केल्या आहेत. तसेच ५ विकेट्स घेतल्या आहेत.

Related Posts
1 of 2,386
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: