भाजपाला मोठा धक्का! जिल्हाध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0 360

वर्धा – वर्धा (Wardha) जिल्ह्याती राजकरणात भारतीय जनता पक्षाला (BJP) काँगेस (congress) ने मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्ष डॉ. गोडे (Dr. Shirish Gode) यांनी पक्षातून राजीनामा देत काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे वर्ध्यात भाजपाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.(Big blow to BJP! District President’s entry into Congress, find out more information)

दोन महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा देत असल्याचे पत्र पाठविले होते. त्यावेळी पाटील यांनी खासदार रामदास तडस यांच्या मार्फत गोडेंची समजूत काढली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्ष उदासीन आहे. बोलणाऱ्यास गप्प केले जाते. जनतेच्या प्रश्नाऐवजी भलत्याच गोष्टीवर वाद केल्या जातात, असे आक्षेप त्यांनी नोंदविले होते. मात्र यापुढे असे होणार नाही. दखल घेतली जाईल अशी हमी गोडेंना वरिष्ठ नेत्यांनी दिली होती.

पोलिसांची मोठी कारवाई, हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Related Posts
1 of 1,512

मात्र भाजप मध्ये घुसमट होत असल्याची भावना ते व्यक्त करतच होते. अखेर आज त्यांनी राजीनामा दिलाच. एका कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच के पटेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,पालकमंत्री सुनील केदार, ज्येष्ठ नेत्या चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या उपस्थितीत डॉ गोडे यांनी काँग्रेस प्रवेश केला. दोन वर्षांपासून ते अध्यक्ष होते. त्या पूर्वी २०१४ मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.(Big blow to BJP! District President’s entry into Congress, find out more information)

हे पण पहा – नऊ ते दहा दिवसात चौकशी पूर्ण करून शासनाला अहवाल दिला जाईल – राधाकृष्ण गमे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: