भारतीय संघात THALA IS BACK , बीसीसीआय कडून मोठी घोषणा

0 349

नवी मुंबई –  पुढ्याच्या महिन्यात होणाऱ्या टी२० वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) भारतीय संघाची घोषणा बीसीसीआय (BCCI) कडून काल दि. ८ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. या संघातून स्टार फलंदाज शिखर धवनला आणि फिरकीपटू युजवेंद्र चहलला संघातून डच्चू देण्यात आला आहे. तर आर.अश्विन (R. Ashwin) ची पुन्हा एखादा मर्यादित षटकांच्या सामन्यात कमबॅक झाले आहे. संघाची घोषणा करताना बीसीसीआय सचिव जय शाह (Jai Shah)  यांनी एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे क्रिकेट प्रेमी खुश झाले आहे. ही घोषणा म्हणजे महेंद्र सिंह धोनीचं भारतीय संघात कमबॅक झाला असून महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) संपूर्ण टी२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघासबोत असणार आहे.

भारताला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी भारतीय संघासोबत वर्ल्डकपमध्ये असणार आहे. यंदाच्या  टी२० वर्ल्डकपमध्ये धोनी भारतीय संघाचा मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत असेल, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी घोषणा केली आहे .

हे पण पहा – काळ आला होता; पण वेळ आली नव्हती…बघा व्हिडीओ… 

 टी२० वर्ल्डकपसाठी असा असणार भारतीय संघ!

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जय शाह आणि चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड करण्यात आली आहे. सुर्यकुमार यादव, राहुल चहर, ईशान किशन, वरुण चक्रवर्ती यांना वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू असतील, असं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात महिला सरपंचाला मारहाण तब्बल आठ जणांवर गुन्हा दाखल

Related Posts
1 of 58
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: