‘एका रात्रीसाठी खेळाडूनं ऑफर केली मोठी रक्कम’,प्रसिद्ध मॉडेलचा गौप्यस्फोट

0 654

नवी मुंबई –  आपल्या देशासह संपूर्ण जगात आपल्या आपल्या देशाचे विविध खेळात प्रतिनिधित्व करणाऱ्या अनके खेळाडूंना ( players) संपूर्ण जगात लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळते. त्यांच्या प्रत्येक गोष्टींचं त्यांचे फॅन्स (Fans) अनुकरण करत असतात. त्यांच्याबद्दल येणाऱ्या प्रत्येक पोस्टिव्ह आणि नेगीटिव्ह बातमीला फॅन्स रिऍक्ट करत असतात. मात्र याच खेळाडूंबद्दल येणाऱ्या काही बातमीमुळे एकच खळबळ उडते. फ्रान्स (France) मध्येही सध्या तेच घडत आहे .

जगातील प्रसिद्ध मॉडेल आणि रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार तसेच OnlyFan ब्यूटी नताली एंड्रियानी (Nathalie Andreani) हिनं फ्रान्सच्या राष्ट्रीय टीममधील एका फुटबॉलपटू वर केलेल्या आरोपामुळे सध्या खळबळ उडाली असून ती सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनली आहे.

फ्रान्सच्या राष्ट्रीय फुटबॉल टीममधील खेळाडूनं आपल्याला सोबत रात्र घालवण्यासाठी मोठी रक्कम देऊ केली होती, असा खळबळजनक आरोप नतालीनं केला आहे. ‘त्या खेळाडूनं आपल्याला 50 हजार युरोची ऑफर दिली होती. मी तो प्रस्ताव तातडीनं फेटाळला. एका राष्ट्रीय टीममधील खेळाडू इतकी खालच्या पातळीवर घसरेल याचा मी कधीही विचार केला नव्हता,’ असं नतालीनं सांगितलं आहे. नतालीनं त्या फुटबॉलपटूचं नाव सांगितलेलं नाही.

 हे पण पहा – मोहटा देवी यात्रा महिला देवदर्शन यात्रा स्थगित – निलेश लंके

कोण आहे नताली?

Related Posts
1 of 81

‘ब्रुनेट ब्यूटी’ म्हणून ओळखली जाणारी नताली 2014 साली ‘सिक्रेट स्टोरी’ या फ्रेंच रिअ‍ॅलिटी टीव्ही शो मुळे सर्वप्रथम चर्चेत आली होती. त्यानंतर 2016 साली ‘हार्टब्रेक व्हिला’मध्येही ती सहभागी झाली होती. 50 वर्षांची नतालीला तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या पुरूषाशी असलेल्या रिलेशनशिपमुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती सध्या OnlyFans च्या माध्यमातून स्वत:चा कंटेट प्रसिद्ध करते.

नताली सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रीय आहे. तिचे इन्स्टाग्राम (Instagram) वर 3,43000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तसंच ट्विटर (Twitter) वर 1.3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

नेहरू मार्केटला भीषण आग , १५ दुकाने आगीत जळली , आगीवर नियंत्रण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: