DNA मराठी

घनश्याम आण्णा शेलार व मा.आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते 30 लाख रुपये कामांचे भूमिपूजन संपन्न..

0 180
Bhumipujan of works worth Rs. 30 lakhs by Ghanshyam Anna Shelar and Hon'ble MLA Rahul Dada Jagtap.
श्रीगोंदा :- दिनांक 3 मे 2022 रोजी श्रीगोंदा तालुका येथील ढवळगाव येथे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार, माजी आमदार राहुल जगताप, पंचायत समिती सदस्य सौ.कल्याणी ताई लोखंडे, मा.सभापती गीतांजली पाडळे, संचालक कुकडी सहकारी साखर कारखाना श्री.संभाजीराजे देविकर यांच्या शुभ हस्ते 30 लाख रुपये कामांचे दलित वस्ती व गावठाण अंतर्गत काँक्रीट रस्ते, पुल करणे, बंदिस्त गटर लाईन, दुहेरी हात पंप, विहीरीवर जाळी, जिल्हा परिषद शाळा व गावठाण अंतर्गत शौचालय, यासंह विविध कामांचे भूमिपूजन संपन्न झाले, घनश्याम अण्णा शेलार यांनी ढवळगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे पालकमंत्री यांनी बिनविरोध गावासाठी दिलेल्या बक्षीसा मधून गावासाठी सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, मुस्लिम कब्रस्तान व हिंदु स्मशानभूमी सुशोभीकरण करण्यासाठी निधी तसेच खंडोबा मंदिरासमोर ब्लॉक बसवण्यासाठी 20 लाख रुपये निधी पालक मंत्री हसन मुश्रीफ साहेबांच्या निधीतून पाठपुरावा केला असून, लवकरच तो निधी वर्ग होणार आहे. म्हणून समस्थ ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

 

याप्रसंगी सरपंच सौ.सारिका शिंदे, उपसरपंच श्री.गणेश पानमंद, माजी सरपंच श्री.विजय शिंदे, माजी सरपंच भाऊसाहेब पानमंद, मा.सरपंच रविंद्र शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.बाबासाहेब शिंदे, मा.चेअरमन गौतम वाळुंज, मा.सरपंच तुकाराम बोरगे,ग्रामपंचायत सदस्य श्री.अजय वाळुंज,श्री.राम शिंदे सर, ग्रामपंचायत सदस्य बबन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य राहुल बोरगे, ग्रामपंचायत सदस्य अजित लोंढे, मा.ग्रा.पं.सदस्य अमोल बोरगे, संचालक विविध कार्यकारी सोसायटी श्री शिवाजी लोंढे मेजर,मा.उपसरपंच रामचंद्र लोंढे मेजर, मा.सरपंच माणिकराव ढवळे, नानासाहेब वाळुंज, दादा चव्हाण, नितीन शिंदे व विलास शिंदे, तात्या शिंदे, प्रवीण श्रीधर शिंदे, ग्रामसेविका महाडीक मॅडम,सौ.प्रतीक्षा चव्हाण,सौ.नंदाबाई शिंदे, पत्रकार दिपक वाघमारे, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष पत्रकार पंकज गणवीर, पत्रकार रामदास कोळपे, ह.भ.प.पंडित महाराज ढवळे, गंगाराम महाराज ढवळे, सोन्याबापू बोरगे,कुमार शिंदे, सुनील शिंदे, सुधीर पोखरकर, धोंडीबा कर्हे,श्री शब्बीर पठाण,मोबीन पठान तसेच टिपू सुलतान ग्रुप व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक रविंद्र शिंदे यांनी केले व मा.सरपंच विजय शिंदे यांनी शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले.

 

 

मा.सरपंच विजय शिंदे यांनी सभापती शंकर पाडळे यांचे विषयी केली खंत व्यक्त, पुढे बोलताना ते म्हणाले येळपणे गणातून पाडळे यांना ढवळगाव मध्ये सर्वाधिक मताधिक्य धिले परंतु पाडळे यांनी त्याची जाण ठेवली नाही,तिन वर्षापासून पाडळे यांना कामा विषय पाठपुरावा करत आहे.परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचा निधी ढवळगाव साठी दिला नाही.परंतु देवदैठण पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या सौ.कल्याणीताई अतुल लोखंडे यांनी आपल्या शेष फंडातुन ढवळगाव साठी मोठा निधी उपलब्ध करून दिला.असे काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना जिल्हा परिषद सदस्य साठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी होताना दिसत होती.

Related Posts
1 of 2,493
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: